FANDOM


कात्रज गावालगत कात्रज तळे आहे. त्याच ठिकाणी ते एक पर्यटन क्षेत्र करण्यासाठी पुणे म.न.पा.तर्फे मोठया प्रमाणावर तेथे सुधारणा व सुशोभीकरण करण्याचे काम चालू आहे. तेथील रहिवासी व अन्य नागरीक तेथे सकाळी उघडयावर प्रात:विधीसाठी सदर परिसराचा वापर करताना आढळले. परिसर अस्वच्छ होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाचे आरोग्य खात्याच्या मदतीने बहुउद्देशिय पथकाने कारवाईस प्रारंभ केला. सकाळपासून तेथे प्रात:विधीसाठी येणाऱ्या नागरीकांना प्रथम तेथे उपलब्ध असलेल्या सुलभ शौचालयाचा वापर करण्यास योग्य त्या सूचना देण्यात आल्या. मार्गदर्शन करूनही त्यातील काही नागरीकांनी त्याचे उल्लंघन केल्याचे आझळून आलेवरून कमीत कमी प्रती नागरीकास रू. 25/- ते रू.50/- पर्यंत दंड घेऊन तोंडी समज दिली. तथापि प्रात:विधीसाठी येणाऱ्या नागरीकांकडे बहुतांशवेळा सकाळी दंड भरण्यासाठी पुरेसे पैसे नसल्याचेही दिसून आले. त्यावर संबंधीत दंड न भरणाऱ्या नागरीकांना तोंडी समज देऊनही कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नसल्याचे दिसून आले. यावरून बहुउद्देशिय पथकाने संबंधीत नागरीकांचे सोबत असलेले डबे, टॉवेल इत्यादी साहित्य जप्त केले. काहींना याबाबत अद्दल घडावी व कारवाई लक्षात रहावी म्हणून उठाबशा काढण्यास भाग पाडले. त्याची छायाचित्रे काढण्यात आली आहे. या कारवाईत पाच नागरीकांकडून रू.125/- दंड वसूल केला असून 25 डबे, 18 टॉवेल व 7 लुंग्या जप्त केल्या. 30 ते 40 लोकांना अन्य नागरीकांवर, आरोग्य निरिक्षक व नगरसेवक यांचे समक्ष उठाबशा काढण्यास लावले. त्याचा परिणाम म्हणून सध्या तेथील नागरीक सुलभ शौचालयाचा वापर करू लागले आहेत व तळयाचा परिसर हागणदारीमुक्त करण्यात आला. तसेच त्यांचेकडून त्यांनी केलेला प्रात:विधीची विष्ठा परिसर स्वच्छ करण्यात आला. याकामी स्थानिक नगरसेवक मा.वसंत मोरे यांचे मोठे सहकार्य लाभले. सदरची कारवाई धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाचे विभागीय आरोग्य निरिक्षक श्री.घोलप, आरोग्य निरिक्षक श्री.मंद्रुपकर, मोकादम श्री.सोमनाथ बिबवे यांचे समवेत बहुउद्देशिय पथकाचे प्रमुख श्री.सपकाळ बी.आर. त्यांचे सहाय्यक श्री.निंबाळकर, श्री.तारळकर, श्री.मोरे यांनी पार पाडली. सदर अभिनव उपक्रमासाठी मा.वसंत मोरे स्थानिक नगरसेवक क्षेत्रिय अधिकारी मा.उमेश माळी व क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी डॉ.केतकी घाटगे यांनी मार्गदर्शन केले.

To 063
To 062
To 061
To 060
To 059
To 058
To 057
To 055
To 054
To 053
To 052
To 051
To 050
To 048
To 047
To 046
To 045

Ad blocker interference detected!


Wikia is a free-to-use site that makes money from advertising. We have a modified experience for viewers using ad blockers

Wikia is not accessible if you’ve made further modifications. Remove the custom ad blocker rule(s) and the page will load as expected.